About Me

Photo-2
आठवतं त्या वयापासून पुस्तकं आणि गाणं हे माझे दोन जिवाभावाचे मित्र आहेत. न कळत्या वयातला एक काळ असा होता की कळो- न कळो मिळतील ती सगळी पुस्तकं आणि मासिकं वाचून काढायची. सगळ्याच गोष्टींचं कुतूहल मनात कायम असायचं. अजूनही आहे. हळूहळू दिसेल ते वाचण्यातून काहीच ठरावीक प्रकारांमधलं वाचन जास्त व्हायला लागलं, त्यातून आपल्याला काय आवडतं आणि काय वाचणं महत्वाचं आहे हे समजत गेलं. तसंच गाण्याचंही. कानावर पडेल ते सगळं ऐकण्यापासून सलग काही दिवस एकच कलाकार किंवा एकच राग ऐकण्याचा वेडेपणाही होतो. यातून जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, संगीत, भाषा आणि इतर अनेक गोष्टी आपल्या जाणीवा कश्या विस्तारत जातात हे जाणवत गेलं. वाचन, संगीत आणि रसिकता या गोष्टी जीवनाचा अविभाज्य भाग केव्हा झाल्या कळलंही नाही. आणि आता मी या निष्कर्षाला आले आहे की अभ्यास करण्याइतकं सूख दुसऱ्या कशात नाही ! याच वाटेवरून जाताना अनेक ज्ञानकण वेचत असताना आपल्यालाही काही सुचतंय, काही लिहावंसं वाटतंय ही उर्मी हाच ईश्वराचा साक्षात्कार असावा इतकं हे आतून आलेलं असतं. त्याच प्रेरणेतून आलेली माझी ही पुस्तकं आणि लेख.. कुसुमाग्रजांनी म्हटलेल्या या ओळी कधीकधी मलाही आपल्या कवेत घेतात… ज्ञानियाचा वा तुकयाचा तोच माझा वंश आहे, माझीया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे ।
Scroll to Top